घोडगंगा या गळीत हंगामात चालू करण्याचा आमचा प्रयत्न – दादापाटील फराटे

Dhak Lekhanicha
0

 घोडगंगा या गळीत हंगामात चालू करण्याचा आमचा प्रयत्न – दादापाटील फराटे


शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर 

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्याकरीता शिरुर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस दादापाटील फराटे, सुधीर फराटे , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे ,आदी उपस्थित होते.

घोडगंगा साखर कारखाना वर ३१५ कोटी रु.चे देणे व कर्ज आहे. पुणे येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्पात  राज्य शासना मार्फत  घोडगंगा कारखान्यास ३० कोटी रु. चे अनुदान  देण्यास ही  तयार होते .तसेच घोडगंगा कारखानाने  एनसीडीसी कडे कर्जाचा प्रस्ताव पाठवावा असे ठरले असताना कारखानाचे चेअरमन व संचालक मंडळ प्रस्तावच पाठवत नाही . घोडगंगा  सहकारी साखर कारखान्या  संदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठवावेत अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे व माजी संचालक सुधीर फराटे यांनी केली 


घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्याकरीता शिरुर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस दादापाटील फराटे, सुधीर फराटे , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे ,आदी उपस्थित होते.

सुधीर फराटे यांनी सांगितले की मागील दोन गळीत  हंगामात घोडगंगा सहकारी साखर करखाना बंद आहे. कारखाना चालू करण्याबाबत अजितदादा पवार यांनी विधानसभा निवसणूकीत शब्द दिला होता. ९ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे साखर  संकुलात आमदार ज्ञानेश्वर कटके , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,  विद्याधर अनास्कर, कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार, दादापाटील फराटे, शशिकांत दसगुडे,  स्वप्नील ढमढेरे,  स्वप्ननील गायकवाड,राहूल पाचर्णे,  रवी काळे, सुधीर फराटे, महेश ढमढेरे यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठक घेतली.

या बैठकीत घोडगंगा कारखान्याच्या सद्यस्थिती बाबत चर्चा झाली. चर्चे दरम्यान अर्थसंकल्पीय आधिवेशनात अर्थसंकल्पात कारखान्यास ३० कोटी रु. अनुदान देण्याचे ठरले. त्यानुसार तसा प्रस्ताव कारखान्याने पाठवावा. त्याच बरोबर एनसीडीसीकडे ३०० को.रु. च्या प्रस्ताव कारखान्याने सादर करावा असे ठरले होते.

कारखाना चालू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  आमदार ज्ञानेश्वर कटके आग्रही आहेत. परंतु आता पर्यत  यसंदर्भात कारखान्याने कोणत्याही  प्रस्ताव दाखल केला नाही. कारखाना संचालक मंडळ व प्रशासनाने आवश्यक प्रस्ताव द्यावेत असे फराटे म्हणाले.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे म्हणाले की शेतक-यांची कामधेनू घोडगंगा साखर कारखाना चालू झाला पाहीजे. अजितदादा पवार यांची भूमिका कारखाना चालू व्हावा अशी आहे . कारखाना प्रशासन ढेपाळले आहे. प्रस्तावच नाही आला तर मदत शासन कशी करणार. प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई होत आहे. काय चौकश्या करायचा त्या करा. पण कारखाना सुरु झाला पाहीजे.

कारखान्या सुरु करण्याबाबत कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ यांच्या समोरासमोर बसून चर्चेची ही तयारी आहे असे फराटे म्हणाले. शशिकांत दसगुडे म्हणाले की कारखान्याचे चेअरमन व संचालक काही महिन्यापूर्वी कर्ज मिळत नाही म्हणून न्यायालयात गेले. आता शासन त्यांना म्हणते आहे की कर्जाचा संदर्भातील प्रस्ताव द्या तर आता प्रस्ताव देत नाही. आमदार ज्ञानेश्वर कटके कारखाना लवकरात लवकर सुरु होऊन, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आग्रही आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!